सलमानच्या बहुप्रतिक्षीत ट्युबलाइट सिनेमाचा दमदार टीझर अखेरीस प्रदर्शित झाला. ट्यूबलाइटचा टीझर पाहिल्यावर सलमानच्या या सिनेमाबद्दलच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या असणार यात काही शंका नाही.

टीझरची सुरूवातच आकाशवाणीवरील युद्धाच्या बातमीने होते. निसर्गरम्य दृश्य ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. अगदी ‘बजरंगी भाईजान’मध्ये ज्यापद्धतीने काश्मिरचे सौंदर्य दाखवण्यात आले होते. त्याच धाटणीचं सौंदर्य या सिनेमातही दिग्दर्शक कबीर खानने दाखवले आहे.

टीझरमध्ये महात्मा गांधींचा काळ, युद्धजन्य परिस्थिती, लडाखमधील शाळा हे सर्व बघण्यात मन रमत असतानाच सलमानची दमदार एण्ट्री दाखवण्यात आली आहे. सलमानच्या एण्ट्रीला टाळ्या मिळाल्याशिवाय राहात नाहीत. हा टीझर बघताना ‘बजरंगी भाईजान’मधला साधा भोळा सलमान डोळ्यासमोर येतो.

संपूर्ण टीझरमध्ये ‘यकीन एक ट्युबलाइट की तरह होता है.. देर से जलता है.. पर जब जलता है तो फुल्ल लाइट कर देता है’… हा आशयघन संवाद लक्ष वेधतो. सोहेल खानने या सिनेमात एका सैनिकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचीही झलक या टीझरमध्ये दिसते. तसेच माटिन रे तंगू या बालकलाकारासोबतची सलमानची जोडी फार सुरेख दिसते. भाईजानने माटिनचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही शेअर केला होता. येत्या ‘ईद’ला सलमानची ही ‘ट्युबलाइट’ तिकीटबारीवर किती ‘प्रकाश’ टाकणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here