ABOUT STEPHEN-

स्टीफन हॉकिंग

Image result for stephen hawking

स्टीफन विल्यम हॉकिंग (जानेवारी ८, १९४२ – १४ मार्च, २०१८:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य होते. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली.

जन्म व बालपण-

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आईइझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती.हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी, डॉ. फ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणी हॉकिंग यांना वाचनाची खूप आवड होती.

शिक्षण-

स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण, सेंन्ट अल्बान्स स्कूल या शाळेत झाले. हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलांना असे वाटत होते कि त्यांनी “युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड” येथे प्रवेश घ्यावा, त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला.

संशोधन-

 

एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.

स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.

१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.

जगप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात ल्युसी, रॉबर्ट आणि टीम ही तीन मुले आहेत.

Related image

स्टीफन हॉकिंग यांचे १० प्रेरणादायी विचार

  • गंमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल.
  • जरी मी हालचाल करु शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे.
  • नेहमी आकाशातील ता-यांकडे पाहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरुक ठेवा.
  • आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करु शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल!
  • आपल्याला जे जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत, त्याबाबत पश्चाताप करु नये.
  • दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्म्या आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका.
  • आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते.
  • कधीही करु शकत नाही असं काहीही नाही.
  • जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/ आयक्यू बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात.
  • ब्रह्माण्डापेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही.

 

शाळेत स्टीफन हॉकिंग हुशार विद्यार्थी नव्हते

Amazing Facts About Stephen Hawking…..

ब्रह्मांडाच्या उत्त्पतीविषयी अनेक महत्वपूर्ण सिद्धांत मांडणारे स्टीफन हॉकिंग हे शाळेत असताना मात्र फारसे हुशार नव्हते. नववीत असताना त्यांना वर्गात सर्वात कमी गुण मिळाले होते. त्यानंतर प्रयत्न करुनही स्टीफन हॉकिंग शाळेत सामान्य विद्यार्थीच राहिले. त्यांच्या शिक्षकांच्या माहितीनुसार स्टीफन हॉकिंग हे खूप आळशी असल्यामुळे अभ्यासाचा कंटाळा करायचे. मात्र, त्या वयातही त्यांना विश्वातील अनेक गोष्टींविषयी कुतूहल होते.

Related image

हॉकिंग ऑक्सफर्डच्या रोईंग टीमचे सदस्य होते
स्टीफन हॉकिंग्ज यांनी भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी ऑक्सफर्डमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांचा स्वभाव खूपच बुजरा होता. त्यामुळे एकटेपणा आणि कंटाळा घालवण्यासाठी ते विद्यापीठाच्या रोईंग टीममध्ये सामील झाले. मात्र, जोरात वल्ही मारण्याएवढी ताकद त्यांच्या अंगात नसल्यामुळे स्टीफन यांना दिशादर्शकाचे काम देण्यात आले.

लहान मुलांसाठीही हॉकिंग यांचे लेखन
स्टीफन हॉकिंग यांची विज्ञानाविषयीची अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत. मात्र, हेच स्टीफन हॉकिंग लहान मुलांसाठीही कथा लिहायचे हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. हॉकिंग यांनी त्यांची मुलगी ल्युसी हॉकिंग हिच्यासोबत लहान मुलांसाठी अनेक कथा लिहल्या होत्या. यापैकी ‘जॉर्जस सिक्रेट की टू युनिव्हर्स’ , ‘जॉर्जस कॉस्मिक ट्रेझर हंट’ ही पुस्तके लोकप्रिय ठरली.

Image result for stephen hawking

हॉकिंग यांची झिरो ग्रॅव्हिटी फ्लाईट
2007मध्ये हॉकिंग यांनी झिरो ग्रॅव्हिटी फ्लाईटचा अनुभव घेतला होता. या फ्लाईटमध्ये शुन्य गुरुत्वाकर्षण स्थितीत माणसाला तरंगात येते. यानिमित्ताने हॉकिंग अनेक वर्षांना आपल्या व्हीलचेअरवरून उठून हवेत तरंगण्याचा अनुभव घेतला होता. भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे माणसांना दुसऱ्या ग्रहावर स्थलांतर करावे लागू शकते. त्यामुळे माणसाने शून्य गुरूत्वाकर्षण असलेल्या स्थितीत वावरायला शिकले पाहिजे, असे मत त्यावेळी हॉकिंग यांनी मांडले होते.

हॉकिंग यांनी कार्टूनमधील स्वत:च्याच पात्राला दिला होता आवाज
हॉकिंग विश्वाची उत्त्पत्ती, कृष्णविवर यासारख्या गंभीर गोष्टींवर भाष्य करत असले तरी त्यांच्या जगण्याची आणखी एक मजेशीर बाजू होती. त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी होती. त्यांनी एका अॅनिमेटेड मालिकेतील द सिम्पसन्स ( The Simpsons ) या पात्राला आवाज दिला होता.

हॉकिंग यांनी कृष्णविवरांच्या अस्तित्त्वाबद्दल लावली होती पैज
स्टीफन हॉकिंग यांनी 1997 साली अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन प्रीस्कील यांच्यासोबत पैज लावली होती. कृष्णविवरांतून कोणतीच गोष्ट सुटू शकत नाही, अगदी माहितीदेखील, असा हॉकिंग यांचा दावा होता. मात्र, त्यांचा हा सिद्धांत पुढे चुकीचा ठरला. त्याबद्दल 2004 मध्ये हॉकिंग यांनी आपला पराभव मान्यही केला होता.

Image result for stephen hawking
हॉकिंग यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज
स्टीफन हॉकिंग यांना बोलण्यासाठी स्पीच सिंथेसायझरचा वापर करावा लागत होता. या सिंथेसायझरमधील त्यांचा आवाज अमेरिकन धाटणीचा होता, परंतु स्टीफन हॉकिंग्ज हे ब्रिटीश होते. कंपनीने हा आवाज अन्य कोणत्याही सिंथेसायझरमध्ये पुन्हा वापरला नाही. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सिंथेसायझरसाठी अधिक सुस्पष्ट आवाज बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, हॉकिंग यांनी नवा आवाज वापरायला नकार दिला. त्यामुळे त्यांचा वैशिष्टपूर्ण आवाज ही त्यांची ओळख झाली होती.

आजार-

१९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेतअमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.

स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here