आता टिव्ही सीरिजमध्ये येणार ‘बाहुबली’

Image result for bahubali

एसएस राजामौली यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान ‘बाहुबली’ चित्रपट टिव्ही सीरिज स्वरुपात काढण्याचा विचार असल्याचे म्हटले होते. इतर सामान्य मालिकांप्रमाणे याचे चित्रण होणार नसल्यामुळे प्रत्येक सिझनमध्ये १० ते १५ भाग याप्रमाणे सीरिज स्वरुपात ‘बाहुबली’वरील मालिका काढावी लागेल, असेही त्यांनी सांगितले होते. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत निर्माता शोबू यांनी या वृत्ताला दुजोरा देत हिंदी भाषेत आम्ही या टिव्ही सीरिजची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शोबू म्हणाले की, ‘बाहुबली’ केवळ आंध्र प्रदेशपुरता मर्यादित राहिला नसून, त्याची प्रसिद्धी जगभरात पसरली आहे. या चित्रपटावर हिंदी भाषेत टेलिव्हिजन सीरिज बनवण्याचे आम्ही निश्चित केले असून, ही सीरिज इतरही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. त्यामुळे आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत ‘बाहुबली सीरिज’ पोहोचवता येईल. मात्र, यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार तसेच टिव्ही सीरिजची कथा कशावर आधारित असणार, हे शोबू यांनी सांगितले नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here