फिल्म्समध्ये या पद्धतीने शूट केले जातात Kissing सीन्स, बघून येईल तुम्हालाही मजा!

सिनेमात हीरो-हिरोईन यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यासाठी किसींग सीन्स आवर्जुन टाकले जातात. मात्र हे सीन्स शूट करताना खास फंडा वापरला जातो. बिहाइंड द कॅमेरा असे सीन्स शूट करणे कधी-कधी गमतीशीरसुद्धा असते. आज आम्ही तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत. या व्हिडिओत एखादा किसींग सीन शूट करण्यासाठी काय केले जाते, हे दाखवण्यात आले आहे. अभिनेत्री काजल आणि हीरो सूर्या यांच्यावर वेगवेगळा हा सीन शूट केला गेला. त्यानंतर स्पेशल इफेक्टच्या मदतीने तो मर्ज करण्यात आला. या व्हिडिओत तुम्हाला ही प्रक्रिया बघता येणारेय.

– 2014 मध्ये समोर आलेल्या बिहाइंड द कॅमेरा व्हिडिओत अभिनेत्री काजल अग्रवाल आणि सूर्या यांनी प्रत्यक्षपणे एकमेकांना किस केले नव्हते. पण या व्हिडिओत स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने हे दोघे एकमेकांना जणू किस करत असल्याचे भासवण्यात आले होते.
– हा सीन 2012 साली रिलीज झालेल्या ‘मात्तारान’ या तामिळ सिनेमातील आहे. एका थिएटरमध्ये काजल आणि सूर्या यांना किस करताना दाखवण्यात आले होते. पण सत्य हे आहे, की दोघांनी एकमेकांना किस केलेच नव्हते. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन वेगवेगळे सीन जोडून हा सीन तयार करण्यात आला होता.
– या बिहाइंड द सीन व्हिडिओ बघून लक्षात येतं, की काजलने सूर्याला नव्हे तर एका उशीला किस केले होते. तर सूर्याने एका प्लास्टिक शीटला किस केले. नंतर व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन्ही सीन जोडून हे दोघे जणू एकमेकांनाच किस करत असल्याचे दाखवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here