भारत गणेशपुरे यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी गोरेगावच्या एका शोरुममध्ये ही नवीन गाडी बुक केली. नवी गाडी घेणार मग जुन्या गाडीचं काय करायचं असा त्यांना प्रश्न पडला होता. तेव्हा, ‘तुमची जुनी गाडी रिसेलमध्ये द्या आणि नव्या गाडीवर ऑफर मिळवा’ असं शोरूममधून भारत यांना सांगणात आलं. त्यानुसार भारत यांनी त्यांची जुनी गाडी शोरूममध्ये दिली.

याबाबत भारत यांनी ‘मुंटा’ला सांगितलं की, ‘शोरूमकडून नवी गाडी खरेदी करताना २ आठवड्यात नव्या कारची डिलिव्हरी करण्यात येईल असं मला सांगण्यात आलं होतं. म्हणूनच मी जुनी गाडी द्यायचा निर्णय घेतला. परंतु कार बुक करून एक महिन्याहून अधिक काळ होऊन गेला तरी गाडी अद्याप मिळू शकलेली नाही. गाडीची डिलिव्हरी करण्यात उशीर का होतोय असं विचारल्यावर, गाडीच्या इंजिनचा प्रॉब्लेम असल्याचं कारण शोरूमकडून सांगण्यात आललं. पण इंजिनचा प्रॉब्लेम असताना गाडीची विक्री करावीच का?’, असा प्रश्न ‌ते विचारतात.

जुनी गाडीही शोरूममध्ये दिल्याने भारतना आता टॅक्सी-रिक्षानं प्रवास करावा लागतोय. १० मे रोजी भारत यांनी शोरूममध्ये पुन्हा फोन केला असता, आता कोणतीही गाडी शोरूममध्ये उपलब्ध नसल्यानं आम्ही डिलिव्हरी करू शकत नाही. जेव्हा कंपनीकडून गाडी येईल तेव्हाच आम्ही तुम्हाला देऊ, असं सांगण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here