रेटिंग 2/5
कलाकार अभय चव्हाण, मुकूंद वचुले, सोनम पवार, अनुया बैचे आणि
बालकलाकार आदेश आवारे
दिग्दर्शक श्याम माहेश्वरी
संगीतकार रोहित मांजरेकर
निर्माता दिपा माहेश्वरी
श्रेणी फॅमिली ड्रामा
कथा – एका निर्मात्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे. त्यातील एका दृश्यासाठी त्याला खऱ्या नोटा वापरायच्या आहेत. या दृश्यासाठी आवश्यक असलेली दोन कोटी रुपयांची रोख रक्कम निर्मात्याने प्रॉपर्टी रुममध्ये एका ट्रंकमध्ये ठेवलेली असते व निर्मात्याचा एक नातेवाईक त्या रकमेचा सांभाळ करत बसलेला असतो.या चित्रीकरणामध्ये चरणदास हा स्पॉटबॉय म्हणून काम करत असतो. निर्माता चरणदासला ती ट्रंक नातेवाईकाकडून घेऊन यायला सांगतो. त्या ट्रंकेला काही कुलुप नसते. ती ट्रंक घेऊन चरणदास चित्रीकरण जिथे चालले आहे तिथे येत असताना ती ट्रंक हातातून खाली पडते. त्यातील पैशांची काही बंडले खाली पडतात. त्यातील एक दोन बंडले गटारात पडून वाहून जातात. त्यामुळे चरणदास खूप घाबरतो. गटारात वाहून गेलेले पैसे आपणच चोरले असा आळ निर्माता घेऊ शकतो असा विचार चरणदासच्या मनात येतो. तो ती ट्रंक तिथेच सोडून पळून जाण्याचाही विचार करतो. पण पुन्हा चोरीच्या आळाचा विचार मनात येताच तो एकच करतो. ती पैशांनी भरलेली ट्रंक डोक्यावर घेऊन तिथून धूम पळत सुटतो. आपल्या गावाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here