अभिनेते रजनीकांत यांचा जावई तसंच बॉलीवुड आणि टॉलीवुडचा स्टार अभिनेता धनुष त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.  धनुष आता लवकरच एका हॉलीवुडच्या सिनेमात काम करताना त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. ‘दि  एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दि फकीर’ या सिनेमात धनुष प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत दिसेल. या सिनेमाचा शुटिंग नुकतंच सुरू झालं आहे. सध्या मुंबईमध्ये सिनेमाचं शुटिंग सुरू आहे.  सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  मुंबईसह पॅरिस, ब्रुसेल्स आणि रोममध्ये हा सिनेमा चित्रित केला जाईल. प्रसिद्ध लेखक रोमान पोर्टुलास यांनी लिहीलेल्या ‘दि  एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दि फकीर’ या कांदबरीवर सिनेमाचं कथानक आधारीत आहे. दिग्दर्शक केन स्कॉट या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक स्कॉट धनुषचं अगदी भरभरून कौतुक करत आहेत.  ‘धनुष हा उत्तम कलाकार आहे, त्याच्या सोबत काम करायला मिळणं हे माझं भाग्य समजतो. धनुषची डान्स आणि गाण्याची एक अनोखी स्टाईल आहे म्हणुनच तो सगळ्यांपेक्षा वेगळा वाटतो’, असं केन स्कॉट यांनी म्हंटलं आहे.  या सिनेमात धनुषबरोबर अभिनेत्री एरिन मोरिआर्टी, सीमा बिस्वास आणि लोरेन लफिट हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसतील..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here