शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा आगामी चित्रपट ‘धोंडी’

शेतकऱ्यांच्या जीवनाचा वेध घेणारा ‘धोंडी’ हा चित्रपट ९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात महत्त्वाचा विषय आणि उत्तम कलाकार पहायला मिळणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक विनय आपटे यांचा हा अखेरचा चित्रपट आहे.

आपल्या वडिलांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी दहा वर्षांचा एक मुलगा काय काय करामती करतो, याची कथा ‘धोंडी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. निरागस बालमन, नातेसंबंध, बदलती नैसर्गिक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या अशा मुद्द्यांवरही हा चित्रपट भाष्य करतो. सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटच्या शिवाजीराव जाधव, संतोष सुतार, निखिल नानगुडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. बोलपट एंटरटेन्मेंट आणि ओशन ९ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मोनिष उद्धव पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटाचं लेखन रोहित पंडित आणि मोनिष पवार, छायालेखन दिनेश सटाणकर तर संगीत दिग्दर्शन किरण राज यांनी केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेते विवेक चाबुकस्वार, सयाजी शिंदे, पूजा पवार, किशोर चौघुले, विनय आपटे, राघवेंद्र कडकोळ, सुहासिनी देशपांडे, उषा नाईक या कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here