बँक खातं, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह सर्वच महत्वाच्या ठिकाणांवर आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आता फेसबुकची भर पडली आहे.

Now Facebook's support base | आता फेसबुकचीही 'आधार'सक्ती

मुंबई – बँक खातं, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह सर्वच महत्वाच्या ठिकाणांवर आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आता फेसबुकची भर पडली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, फेक अकाऊंटला आळा घालण्यासाठी फेसबुक आधारसक्ती करु शकते. भारतामध्ये फेसबुकवर नवीन खातं उघण्यासाठी सध्या आधारची माहिती विचारली जात असल्याचे समोर आलं आहे. लवकरच जुन्या वापरकर्त्यांनाही फेसबुक आधारसक्ती करु शकते. नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी सरकारनं ‘युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’ अर्थात आधार कार्ड आमंलात आणलं होतं.

‘आधारकार्डवर जे तुमचं नाव आहे.  तेच नाव फेसबुकवर खातं उघडताना नाव टाका, जेणेकरुन तुमचे मित्र-मैत्रीणी तुम्हाला सहजपणे शोधू शकतील. अशा पद्धतीचा मेसेज नवीन खातं उघडताना फेसबुककडून येतोय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here