आयुष्य सेलिब्रेट करायला शिकवणारा ‘हृदयांतर’

Image result for hrudayantar

सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शित पहिला मराठी सिनेमा ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचा ”क्रिश” हृतिक रोशन यानिमित्तानं प्रथमच मराठी सिनेमात दिसणार आहे. यात हृतिक पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत आहे. 7 जुलै रोजी हा सिने बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

‘हृदयांतर’ सिनेमाच्या ट्रेलरमधील एक-एक संवाद मनाला भिडणारे आहेत. शेखर जोशी आणि समिरा जोशी यांच्या अरेंज्ड मॅरिजची ही कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कुटुंब, भांडणं, वाद, दुरावा, जगण्यातील परीक्षा, आयुष्यात आलेलं भयानक वळण आणि यातून दुरावलेली मनं पुन्हा एकत्र येणे, अशीच काहीशी या सिनेमाची कहाणी ट्रेलरमध्ये दिसत आहे. मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे या दोघांची सिनेमामध्ये मुख्य भूमिका आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here