शेवटचे 12 चेंडू अन् मुंबईचा पराभव!

शेवटचे 12 चेंडू आणि पंजाबचा विजय:

 

मुंबईनं प्रचंड धावा केल्यानंतरही शेवटच्या दोन ओव्हरमध्ये मुंबईला आवश्यक असणाऱ्या धावा संदीप शर्मा आणि मोहित शर्मा या जोडगोळीनं करु दिल्या नाहीत.

18व्या ओव्हरनंतर सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूनं झुकला होता. मुंबईला 12 चेंडूत फक्त 23 धावा हव्या होत्या. त्यावेळी कर्णधार मॅक्सवेलनं संदीप शर्माला 19वी ओव्हर दिली. या ओव्हरमध्ये संदीप शर्मानं 6 चेंडूंपैकी 2 चेंडूवर एकही धाव घेऊ दिली नाही. त्याने या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. संदीपनं या ओव्हरमध्ये एकही चौकार दिला नाही. त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा दबाव आला.

यानंतर शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावांची गरज होती. तेव्हा क्रीझवर धडाकेबाज पोलार्ड होता. तेव्हा कर्णधार मॅक्सवेलनं मोहित शर्मावर विश्वास दाखवत चेंडू त्यांच्याकडे सोपवला. मोहितनं पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली. त्यानंतर पोलार्डनं दुसऱ्याच चेंडूवर थेट षटकार ठोकून मुंबईच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. मुंबईला विजयासाठी 4 चेंडूत 9 धाव हव्या होत्या. पण पुढचे तीनही चेंडू मोहितनं अप्रतिम टाकले. या तीन चेंडूमध्ये मोहितनं पोलार्डला एकही धाव घेऊ दिली नाही. त्यामुळे पंजाबचा विजय निश्चित झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here