‘इंडिया मी येत आहे…. तुम्ही तयार आहात ना?’

जस्टिन भारतात येणार म्हणून त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाहीये. पण, तुम्हाला माहितीये का? भारतात येण्यासाठी खुद्द जस्टिनही खूपच उत्सुक आहे. त्याने एक ट्विट करत ही उत्सुकता व्यक्त केली आहे. ‘पर्पज वर्ल्ड टूर’च्या निमित्ताने दुबईमधील कॉन्सर्ट आटोपून जस्टिन आणि त्याची टीम भारत दौऱ्यासाठी रवाना झाली त्यावेळी त्याने हे ट्विट केलं. ‘दुबई अतुल्य आहे.. आता भारताकडे प्रयाण…’ असं ट्विट त्याने केलं आहे.

जस्टिनचं हे ट्विट पाहता तोसुद्धा भारतात परफॉर्म करण्यासाठी उत्सुक आहे हे स्पष्ट होतंय. भारत दौऱ्यासाठी जस्टिन मुंबईत दाखल झाला असून, आज नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये तो परफॉर्म करणार आहे. जस्टिनच्या या ‘पर्पज टूर’मध्ये आतापर्यंत त्याने अमेरिका, कॅनडा या देशांना भेट दिली होती. त्यासोबतच ‘वर्ल्ड टूर’साठी निघालेल्या जस्टिन सध्या मेक्सिको, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या देशांना भेट दिल्यानंतर आता त्याचा मोर्चा आशिया खंडाकडे वळला आहे.

Dubai is incredible… India you are next. @Amit_Bhatia99 u ready?

दरम्यान, हा जस्टिनचा पहिलाच भारत दौरा असून आजपर्यंत कधीही न पाहिला गेलेला एक वेगळाच आणि हटके कार्यक्रम तो नवी मुंबईत होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सादर करणार असल्याचं या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं आहे. या ग्लोबल स्टारच्या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जवळपास ४५००० प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे. आपल्या संपूर्ण टीमसोबत भारतात आलेल्या जस्टिनच्या पाहुणचारासाठीही खास सोय केली असून त्याच्या स्वागतासाठी बॉलिवूड आणि फॅशन जगतही सज्ज झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here