जस्टीन बिबर आला आणि गेला

भारतामध्ये पहिल्यांदाच आला होता जस्टीन…

‘बेबी बेबी’ हे गाणं ऐकलं तेव्हाच मनाचं वेध घेणारं वाटलं. गाणारं पोरगं पण चुणचुणीत वाटलं. खरतर कमी वयात प्रसिद्धी मिळवणारे आजकाल खूप आहेत. आपल्याकडे तर उठसुठ लाईव्ह शोमधून असे कमी वयाचे चेहरे समोर येत असतात. काही दिवस रेंगाळतात आणि मग उन्हामुळे सावली लांब व्हावी अन एकदम ती नाहीशी होऊन जावी अगदी त्याप्रमाणे या चेहऱ्यांचे होते. ‘I know you love me’ असा म्हणणारा हा मुलगा किती काळ टिकेल ही शंका मनात ठेऊन ते गाण काहीवेळा ऐकलं आणि सोडूनही दिलं… पण हाच मुलगा माझ्या देशात कार्यक्रमासाठी आल्यानंतर ७५ हजाराची तिकीट घेईल हा कल्पनाविलास तेव्हा रंगवणे म्हणजे कल्पनेचे तीर मारले असे झाले असते. त्याचा शो भारतात होणार आणि तेही आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही बातमी शोच्या आर्थिक गणितांनीच जास्त प्रसिद्धीच्या झोतात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here