एकमेकांशी आता बोलतही नाहीत…

 

कंगना रणौत आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू. जिथे कंगना आहे तिथे एखादा वाद हा होतोच. मग त्या वादाची चर्चा होते आणि चर्चांची बातमी. यावेळीही असेच काहीसे झाले. कंगनाने सुपरस्टार प्रभाससोबत पुरी जगन्नाथ दिग्दर्शित ‘एक निरंजन’ या सिनेमात स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाची कथा प्रभासच्या भोवतीच फिरताना दाखवण्यात आली होती. प्रभास या सिनेमात गुन्हेगारांना पकडून पोलिसांकडे सुपूर्द करत असतो आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून पैसे घेत असतो. या सिनेमाच्या दरम्यान कंगनाला प्रसिद्धी मिळायला सुरूवात झाली होती.

‘एक निरंजन’ सिनेमात कंगनाच्या व्यक्तिरेखेचं नाव समीरा होतं. २००८ मध्ये फॅशन सिनेमानंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अनेकांना हे माहितही नसेल की कंगनाने फक्त तेलगु सिनेमातच नाही तर तामिळ सिनेमांतही काम केले आहे. तेलगुमध्ये प्रभासचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. पण असे असूनही हा सिनेमा फारसा चालला नव्हता.

एका मुलाखतीत प्रभाससोबतच्या वादावर बोलताना कंगना म्हणाली की, ‘आमच्यातील वाद इतका टोकाचा होता की, आम्ही एकेमकांशी बोलणं बंद केलं होतं.’ ‘बाहुबली’ सिनेमाचा दाखला देत तिने प्रभासचे कौतुकदेखील केले. ‘प्रभासचे यश पाहून मी आनंदित झालेय,’ असेही कंगनाने म्हटले. सध्या प्रभास आणि कंगना दोघंही आपल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहेत. राजामौली यांच्या ‘बाहुबली’मुळे प्रभास जागतिक स्टार बनला आहे तर कंगनाचे जागतिक स्टार बनणे अजून बाकी आहे.

प्रभासने ‘साहो’ या सिनेमाव्यतिरिक्त त्याच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा केली नाहीये. ‘बाहुबली’ सिनेमात मध्यांतरामध्ये ‘साहो’चा टिझर दाखवण्यात येतो. या सिनेमाच्या चित्रीकरणाला अजून सुरूवातही झाली नाहीये. तर दुसरीकडे कंगना तिच्या ‘मणिकर्णिका– द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here