Maherachi sadi 2

 

आताची पिढी मॉडर्न झाली म्हणून असे चित्रपट पाहणार नाही किंवा त्यांना आवडणार नाही असं

९० च्या दशकात आलेल्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने लोकप्रियतेचा आणि उत्पन्नाचा उच्चांक गाठला होता. मराठी रसिकांच्या मनावर विशेषतः महिला रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाचा आता लवकरच सिक्वल येणार आहे. ‘माहेरची साडी’ या १९९१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची अफाट लोकप्रियता आजही कायम आहे. हे जाणून आता दिग्दर्शक विजय कोंडके याच चित्रपटाचा दुसरा भाग निर्माण करत आहेत. चित्रपटाची पटकथा तयार असून कलाकार व तंत्रज्ञ यांची निवड होताच लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला ‘माहेरची साडी’ त्यावेळी मराठीतला ब्लॉकबास्टर चित्रपट ठरला होता.

‘माहेरची साडी २’ विषयी लॉकसत्ता ऑनलाइनशी बोलताना विजय कोंडके म्हणाले की, सध्या मी चित्रपटाच्या कथेवर काम करत असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर कलाकारांची निवड करण्यात येईल. पुढे माहेरची साडी २ काढण्याचा माझा विचार आधीपासूनच होता. माहेरची साडीमध्ये अलका शेवटी मरते असं दाखविण्यात आलं होतं. ती गेल्यानंतर तिने जन्म दिलेल्या मुलाचं आणि तिच्या कुटुंबाच काय झालं असेल? या अनुषंगाने आता हा पुढचा चित्रपट सुरु होईल.

6425016622767926961-account_id3

८०-९०च्या दशकातील चित्रपट आणि आताच्या चित्रपटांमध्ये बराच फरक आहे. मग, त्यामध्ये माहेरची साडीसारखा चित्रपटाची कथा लोकांना आवडेल का? असा प्रश्न केला असता कोंडके म्हणाले की, चित्रपटांच स्वरुप जरी बदललं असलं तरी कुटुंब अजून बदलेली नाहीत. कुटुंबव्यवस्थेत जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत तेवढा बदल प्रेक्षकांच्या दृष्टिकोनात जाणवणार नाही. आताची पिढी मॉडर्न झाली म्हणून असे चित्रपट पाहणार नाही किंवा त्यांना आवडणार नाही असं होणार नाही. त्यामुळे जुन्या आणि नवीन पिढीचा समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. चित्रपटातील अलका कुबलचा मुलगा आता २५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे दोन्ही पिढींचे विचार आम्ही यात दाखवणार आहोत. जेणेकरून, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा चित्रपट आवडेल. करणूकप्रधान आणि कौटुंबिक असा हा चित्रपट असेल.

माहेरची साडी चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल यांनी सोशिक सूनेची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यावेळी मराठीत बऱयाच काळानंतर एखाद्या चित्रपटाने एवढे घसघशीत यश मिळविले होते. मुख्य म्हणजे या चित्रपटामुळे अलका कुबल हे नाव महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोहोचले. भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्यावर आधारलेल्या या चित्रपटातील गाणी ही चांगलीच गाजली. त्यातील ‘नेसली माहेरची साडी….’ हे गाणं तर खूपच लोकप्रिय झालं होतं. अलका कुबल, विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर यांसारख्या मात्तबर कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका होत्या.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here