सलमान पाठोपाठ आता ‘सिंघम’ही मराठी चित्रपटांच्या प्रेमात!

टेलिव्हिजन मालिका, नाटक आणि वेब सीरीजच्या विश्वातून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता अमेय वाघ आणि वेबविश्वात सध्या चर्चेत असणारी ‘मीरा सेहगल’ म्हणजेच अभिनेत्री मिथिला पालकर ‘मुरांबा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर सध्या प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडिओमधील हा शेवटचा व्हिडिओ आहे, असं म्हणायला हरकत नाही.

तरुणाई, त्यांची प्रेमप्रकरणं आणि घरातल्या मंडळींचा या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन याचं एकंदर चित्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सत्तरच्या दशकातील फिल्मी आई, ‘आता बच्चन नका देऊ…’ असं म्हणणारा मुलगा, आई-वडिलांच्या वागण्यामुळे मुलांना होणारा अवघडलेपणा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या प्रेमप्रकरणाचा सुगावा जेव्हा घरातल्या मंडळींना लागतो तेव्हा नेमकी काय मानसिक स्थिती असते अगदी त्याच पद्धतीचं चित्रण ‘मुरांबा’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

Muramba Official Trailer | Sachin Khedekar, Amey Wagh, Mithila…

आता बरणी थेट २ जूनला उघडेल त्या आधी हा एक चमचा चाखून पहा! आम्हाला खात्री आहे याची चव २ जूनपर्यंत तुमच्या मनात राहील आणि 'आणखी हवा' म्हणून तुम्ही निश्चित थिएटरमध्ये याल, तेव्हा पुन्हा भेटूच तोंड गोड करायला! 😊#Muramba #2June #Mithilamey

Posted by Muramba on Montag, 22. Mai 2017

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here