Nokia new Mobile Old Model-3110

एकेकाळी मोबाईल जगतातील बाप समजली जाणारी नोकिया कंपनी पुन्हा त्याच दमात पुन्हा बाजार काबिज करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे बाकीच्या मोबाईल कंपन्याना आता नक्कीच धडकी भरणार आहे. नोकियाच्या मोबाईलचे उत्पादन करणाऱ्या एचएमडी ग्लोबल या कंपनीने या फोनची निर्मिती केली आहे. काही वर्षांपूर्वी सर्वात जास्त विक्री असलेला मोबाईल म्हणून ख्याती असलेला 3310 हॅंडसेट दमदार आगमन करत आहे. पण यावेळेस थोडा अपग्रेड होऊन येतोय. त्यामुळे नव्या रुपात अनेक चांगली फीचर्स फिचर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि याची किंमत ऐकून तर तुम्ही नक्कच चकित व्हाल.

सध्या भारतात हा फोन चार रंगांत येणार आहे. यातील लाल आणि पिवळ्या रंगाचे मॉडेल ग्लॉस फिनिशमध्ये असेल तर निळ्या आणि राखाडी रंगाचे मॉडेल मॅट फिनिशमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. ३३१० या मोबाईलची बॅटरी चांगल्या प्रतीची असून ग्राहक दिवसभर मोबाईलवर बोलले तरीही ती टिकून राहू शकते असा दावाही कंपनीने केला आहे. या फोनमधून नागरीकांना कॉलिंगशिवाय मेसेज पाठविणे, छायाचित्र काढणे अशा किमान सुविधांसह एफएम रेडिओ आणि एमपीथ्री प्लेयर अशा सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

 

‘सध्या बाजारात अनेक नवीन स्मार्टफोन आले असले तरीही हा फोन पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंदाचे भाव उमटतील. या फोनमुळे तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतील. याची बॅटरीही आता बाजारात असणाऱ्या फोनइतकीच चांगली असल्याने ग्राहकांची निश्चितच निराशा होणार नाही.’ असे याविषयी  एचएमडी ग्लोबल कंपनीचे उपाध्यक्ष अजेय मेहता यांनी सांगितले.

file photo

 Nokia 3110-Prize In India 3310  31 may all online stores

काय आहेत फिचर्स

फोनची बॅटरी १२०० मिलीअॅंपियर्सची असून डिस्प्ले २.४ इंच आहे. यासोबत क्लासिक न्यूमेरिक किबोर्डही देण्यात आला आहे. या फोनची डिझाईन पूर्वी जागलेल्या जुन्या नोकीया ३३१० फोनसारखीच असून त्याच्या सुविधांमध्ये बदल करण्यात आले असल्याचेही मेहता यांनी स्पष्ट केले. इंटर्नल स्टोरेज १६ जीबी असलेल्या या फोनची एक्सपांडेबल मेमरी ३२ जीबी इतकी असणार आहे. याशिवाय मोबाईलमध्ये इनबील्ट एमपीथ्री प्लेयर आणि २ मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे. हा २जी फिचर फोन असून यात दोन सीमकार्ड वापरता येणार आहेत. अशाप्रकारे ३३१० हे जुने मॉडेल नव्याने बाजारात येत असल्याचे नोकियाने जाहीर केले असले तरीही नोकियाचे स्मार्टफोन कधी येणार हे अद्याप स्पष्ट केले नाही.

किती आहे किंमत

एवढे चांगलेल फिचर्स असल्यानंतर या मोबाईलची किंमत कती असेल असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. हा तर ३३१० मॉडेल नंबर असलेल्या या फोनची किंमतही कंपनीने ३३१० रुपये इतकीच ठेवली आहे. त्यामुळे किंमतही तुम्हाला परवडणारी आहे. फोन भारतात १८ मे रोजी दुकानांमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here