अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओढ’ या चित्रपटालाही प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती असलेल्या ‘ओढ’ ची निर्मिती एस. आर. तोवर यांनी तर दिग्दर्शन नागेश दरक व एस. आर.तोवर यांनी केले आहे.

आयुष्याच्या वाटेवर दिशादर्शक ठरणारा महत्त्वाचा वाटसरु म्हणजे मित्र. मैत्रीच्या अनेक परिभाषा आणि व्याख्या आहेत. अशीच एक परिभाषा उलगडणाऱ्या ‘ओढ’ चित्रपटात गणेश व दिव्याच्या निखळ मैत्रीची कथा सांगितली आहे गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी ‘ओढ’ या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. मालिकेत राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी उल्का ‘ओढ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटांकडे वळली आहे. या  दोघांसोबत मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर,  जयवंत भालेकर यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

‘ओढ’ ची कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केले आहे. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या चित्रपटातील गीतांना लाभला आहे. या चित्रपटाचे  छायांकन रविकांत रेड्डी व संकलन समीर शेख यांनी केले आहे. वेशभूषा सुनिता घोरावत तर रंगभूषा प्रदीप दादा, बंधु धुळप यांची आहे. कलादिग्दर्शक आरिफ खान आहेत.
‘ओढ’ चित्रपटाला प्रेक्षक पसंतीची पावती
संजाली रोडे , कौतुक शिरोडकर, अभय इनामदार, कुकू प्रभास यांनी यातील चार वेगवेगळ्या जॅानरची गाणी लिहिली आहेत. आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ही गाणी गायली आहेत. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here