‘बाहुबली’सोबत रोमान्स करणार कतरिना?

 

पुन्हा एकदा पाहता येणार प्रभासचे थरारक स्टंट्स

सलग चार ते पाच वर्षे ‘बाहुबली’ चित्रपटासाठी मेहनत घेतल्यानंतर आता अभिनेता प्रभास विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाहुबली २’ प्रदर्शित झाला त्याच दिवशी प्रभासच्या आगामी चित्रपटाचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला. ‘साहो’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून प्रभास या चित्रपटामध्ये थरारक स्टंट्स करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री स्क्रिन शेअर करणार, हाच प्रश्न अनेकांना पडत होता. प्रभासची लोकप्रियता पाहता त्या भूमिकेसाठी बऱ्याच अभिनेत्रींची नावं पुढे येत होती. पण, ‘फिल्मफेअर’च्या वृत्तानुसार आता मात्र त्याच्या या चित्रपटासाठीच्या लिडिंग लेडीचा शोध संपला असून, या चित्रपटाच अभिनेत्री कतरिना कैफ झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here