प्रियांकाने पुन्हा शॉर्ट ड्रेस घालून ट्रोलला दिले उत्तर

Image result for priyanka chopra troll dress

बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना अभिनेत्री प्रियांका चोप्राने परिधान केलेल्या पोशाखावरुन सोशल नेटवर्किंग साईटसवर प्रियांकाला चांगलेच फैलावर घेण्यात आले. प्रियांकाने मोदींची भेट घेताना पांढ-या रंगाचा वनपीस घातला होता. मात्र हाच तिचा ड्रेन अनेकांना खटकला. प्रियांक तू देशाच्या पंतप्रधानांसमोर बसली होतीस तेव्हा कसे कपडे घालायचे याचे तुला तारतम्य असले पाहिजे असे एका युझरने तिला सुनावले. अनेकांनी प्रियांकाला तिच्या पोषाखावरुन ट्रोल केले.

त्यावर प्रियांकाने तिच्या आईसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअरकरुन उत्तर दिले आहे. या फोटोमध्ये प्रियांका आणि तिची आई दोघीही शॉर्ट ड्रेसमध्ये आहेत. सध्या प्रियांका बर्लिनमध्ये आपल्या बेवॉच चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. मोदी मंगळवारी जर्मन दौ-यावर असताना प्रियांकाही तिथे होती. त्यावेळी तिथे पंतप्रधानांची भेट घेतली.

बर्लिनमध्ये मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असण्याचा सुंदर योगायोग जुळून आला. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मला आज सकाळी भेटल्याबद्दल तुमचे खूप आभार’, असे ट्विट अभिनेत्री प्रियांका चोप्राने या भेटीनंतर केले होते.

पंतप्रधान मोदी सध्या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. 29 मे रोजी मोदी जर्मनीमध्ये दाखल झाले होते. मोदींनी तिथे जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली. मर्केल यांच्याबरोबर विविध मुद्यांवर समाधानकारक चर्चा झाल्याचे मोदींनी टि्वट करुन सांगितले होते.

बेवॉच या सिनेमातून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. 2 जून रोजी हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. खरंतर बेवॉच या सिनेमाला सिने समिक्षकांनी चांगले रिव्ह्यू दिले नाही पण सिनेमातील प्रियांकाच्या कामाचं कौतुक होत आहे. पीसीला हॉलिवूडपटात पाहण्यासाठी तिचे फॅन्सही आता उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here