सचिन तेंडुलकर आता कबड्डीच्या मैदानात

File Photo

क्रिकेटच्या मैदानात आपला करिश्मा दाखविल्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कबड्डीच्या मैदानात उतरणार आहे. सचिन तेंडुलकर लवकरच प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमातील एक टीम मालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रो-कबड्डीच्या येत्या पर्वात चार नव्या टीम्स सहभागी होणार आहेत. स्टार स्पोर्टसच्या प्रो कबड्डी लीगमधल्या चेन्नईस्थित फ्रँचाईझीमध्ये सचिननं गुंतवणूक केली आहे.

तामिळनाडूच्या टीमची मालकी सचिनकडे असणार आहे. त्याच्यासह व्यावसायिक एन. प्रसादही टीमचे कोओनर म्हणजेच सहमालक असतील. इतर तीन टीम्सची मालकी जेएसडब्ल्यू, अदानी ग्रुप आणि जीएमआर ग्रुप यांनी घेतली आहे. त्यांच्या टीम्सची नावं हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांची असणार आहेत.

                              PRO KABBADI

प्रो-कबड्डीमध्ये नव्या फ्रँचायझीचे स्वागत करताना स्टार इंडियाचे चेअरमन उदय शंकर यांनी देशाच्या रांगड्या खेळाच्या वाढीसाठी पुढाकार घेतलेल्या टीम मालकांचे आभार मानले आहेत. प्रो कबड्डीच्या आगामी मोसमाचे आयोजन जुलै व ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. या लीगमध्ये यापूर्वी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, पटना, पुणे आणि जयपूर या टीम्स सहभागी झाल्या आहेत.

तामिळनाडू टीमचे हक्क इक्वेस्ट एन्टरप्राईझेस प्रायव्हेट लिमिटेडनं मिळवले आहेत. या कंपनीत सचिन तेंडुलकर आणि उद्योजक एन. प्रसाद यांची गुंतवणूक आहे. चेन्नईच्या फ्रॅँचायझीचा सचिन तेंडुलकर सहमालक असणार असून टीमचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here