असा रंगणार राणा आणि दलजितचा वज्रकेसरी सामना
शूटिंगच्या पहिल्या दिवशी खऱ्या खुऱ्या पैलवानांच्या अनेक प्रदर्शनी कुस्तीही येथे झाल्या. राणा आणि दलजीतचा सामना पाहाण्यासाठी गावा गावातून लोकं आली असून या विशेष भागासाठी कुस्ती क्षेत्रात अढळ स्थान मिळवलेले काही दिग्गज मान्यवरही उपस्थित होते. दुखण्याला घाबरत नाही तो सच्चा पैलवान त्यामुळे राणादा दलजितला धुळ चारत मैदान मारणार यात शंकाच नाही.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत गेले काही दिवसांपासून ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहात आहेहत तो क्षण अखेर रसिकांना पाहता येणार आहे. अपघात झाल्यानंतर त्याने शेती आणि कुस्तीची आशाच सोडली होती.त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या राणाला अखेर या मातीनेच पुन्हा उठून उभं राहाण्याचं बळ दिलं.अंजली आणि गावकऱ्यांच्या साथीने राणा वज्रकेसरीसाठी पुन्हा उभा राहीलाय.येत्या २६ नोव्हेंबरला राणा आणि दलजितचा जंगी कुस्तीचा सामना रंगणार आहे. अंजलीला वाढदिवसाची भेट म्हणून वज्रकेसरीची गदा आणण्याचा राणाचा निश्चय आहे.पण दलजितला हाताशी घेऊन नंदिताने काही नवे डावपेच आखलेत.अटीतटीच्या या सामन्यात हिमालयाला सह्याद्रीचा मावळा भिडणार आहे.या महाएपिसोडसाठी १७ ते १९ नोव्हेंबरला कोल्हापूर जवळील इचलकरंजी इथे शूटिंग पार पडले. शूटिंगच्या पहिल्या दिवशी खऱ्या खुऱ्या पैलवानांच्या अनेक प्रदर्शनी कुस्तीही येथे झाल्या. राणा आणि दलजीतचा सामना पाहाण्यासाठी गावा गावातून लोकं आली असून या विशेष भागासाठी कुस्ती क्षेत्रात अढळ स्थान मिळवलेले काही दिग्गज मान्यवरही उपस्थित होते. दुखण्याला घाबरत नाही तो सच्चा पैलवान त्यामुळे राणादा दलजितला धुळ चारत मैदान मारणार यात शंकाच नाही.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here