रजनीकांत-

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत ‘कबाली’नंतर लवकरच नव्या चित्रपटात दिसणार आहेत. विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन, सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण आणि राधिका आपटे यांच्यासोबत रोमान्स केल्यानंतर ते आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत यात काम करताना दिसतील.

 

तब्बल आठ वर्षांनंतर रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. १५ ते १९ मे या चार दिवसांत ते चाहत्यांना भेटतील. त्यादरम्यानच, त्यांनी दिग्दर्शक पा रंजिथ यांच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली. या चित्रपटाचे अद्याप शीर्षक ठरलेले नाही. येत्या २८ तारखेपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असून, हुमा कुरेशी यात रजनीकांत यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार असल्याचे म्हटले जातंय. चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटासाठी एका दमदार अभिनेत्रीचा शोध होता. त्यांचा हा शोध हुमाजवळ येऊन थांबला. हुमाला ही ऑफर मिळाली आणि तिनेही लगेच ती स्वीकारली. हुमासाठी ही नक्कीच एक मोठी संधी आहे. रजनीकांतसारख्या मेगास्टारसोबत काम करण्यासाठी ती खूप उत्सुक आहे. रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

Upcoming Movie 2.0

पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा ‘२.०’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘रोबोट’ या चित्रपटाचा हा सिक्वल असून, यात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. दरम्यान, अक्षयसोबतच्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटात हुमा अखेरची पडद्यावर झळकली होती. त्यानंतर ती आता २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ऑकलस’ या अमेरिकी भयपटावर आधारित ‘दोबारा : सी युअर एव्हिल’ या चित्रपटात भाऊ साकिब सलीम याच्यासोबत काम करताना दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here