Rakshas Marathi Movie

  • भाषा – मराठी
  • कलाकार – शरद केळकर, सई ताम्हणकर, ऋतुजा देशपांडे
  • निर्माता – विवेक कजारिया, निलेश नवलखा
  • दिग्दर्शक – ज्ञानेश झोटिंग
  • Duration – २ तास २० मिनिटे
  • Genre – ड्रामा

अविनाश (शरद केळकर) आदिवासी लोकांच्या जीवनावर डॉक्युमेंट्री बनवत असतो. त्यासाठी अनेक वेळा तो आदिवासीच्या वस्तींमध्ये जात असतो. एकदा तो त्याच्यासोबत त्याची मुलगी अरु (ऋतुजा देशपांडे) ला घेऊन जातो. अरुला तिथल्या एका जंगलात एक पुस्तक मिळते. या पुस्तकामध्ये राक्षसाच्या तावडीतून राजकन्या राजाची सुटका कशी केली असते याची गोष्ट लिहिलेली असते. पण या पुस्कातील शेवटची काही पाने रिकामी असतात. हे पुस्तक घेऊन अरु मुंबईला परतते. पण मुंबईला आल्यानंतर काहीच दिवसात अविनाशला आदिवासींच्या वस्तीत परत जावे लागते. अविनाश काहीच दिवसांत तिथून परत येईल असे त्याने त्याची पत्नी इरावती (सई ताम्हणकर)ला सांगितलेले असते. पण त्याच दरम्यान त्या आदिवासी पाड्यातील भिला (उमेश जगताप) एका पोलिसाची हत्या करतो अशी बातमी मीडियात दाखवली जाते. ही बातमी ऐकल्यावर इरावती अविनाशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. पण अविनाशचा फोनच लागत नसल्याने ती अरुसोबत त्या आदिवासी पाड्यात जाते. तिथे गेल्यावर अरु आणि इरावती तिथल्या एका सर्किट हाऊसमध्ये राहात असतात. तिथून अरु रात्रीच्या वेळी जंगलात जाते आणि तिथे गेल्यानंतर अरुला एक म्हातारा (याकूब सैद) भेटतो. तो अरुला काही कोडी सोडवण्यासाठी सांगतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here