माझ्यासोबत कतरिना कुठेही येईल- सलमान खान

अभिनेता सलमान खान ज्या कार्यक्रमाला हजेरी लावतो त्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा कल्ला पाहायला मिळतोच. त्यासोबतच सलमान आता काय बोलणार याकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या असतात. अशाच एका कार्यक्रमाला नुकतीच सलमानने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफही हजर होती.

आयफा २०१७ पुरस्कारासंदर्भात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आयफा पुरस्कार सोहळा जुलै महिन्यात न्यू यॉर्कमध्ये पार पडणार असून, न्यू यॉर्कच्या मेटलाइफ स्टेडिअमवर १४ आणि १५ जुलैला हा दिमाखदार सोहळा पार पडेल. या सोहळ्यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अभिनेत्री आलिया भट्टही उपस्थित होती. पण, त्या ठिकाणी मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे कतरिना आणि सलमान. काही वर्षांपूर्वी सलमान आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. खासगी पातळीवर कॅट आणि दबंग खानचं नातं फार काळ तग धरु शकलं नाही तरीही कलाविश्वातील सहकलाकार म्हणून हे दोघंही एकमेकांचा आदर करतात. त्यांच्यात आजही चांगली मैत्री पाहायला मिळते. या कार्यक्रमातही त्यांचं हे मैत्रीचं नातं पाहायला मिळालं.

Image result for salman katrina iifa 2017

प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देताना सलमान आणि कतरिनावरच अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. त्यादरम्यानच आयफा पुरस्कारांनंतर न्यू यॉर्कमध्ये कोणत्या ठिकाणांना भेट द्यायला आवडेल, असा प्रश्न एका पत्रकाराने आलिया आणि कॅटला विचारला. त्यावर आलिया म्हणाली, कतरिना नेईल तिथे मी जाईन. तिच्या याच उत्तरावर मध्येच सलमान मिश्किलपणे म्हणाला की,…. आणि कतरिना त्याच ठिकाणी जाईल जिथे मी तिला घेऊन जाईन.

त्याच्या या उत्तरानंतर एका प्रतिनिधीने आलियाला आणखी एक प्रश्न विचारला, ‘तू येत्या काळात सलमानसोबत कधी काम करणार?’ त्यावर कतरिनाने माईक हातात घेतला आणि ती म्हणाली, ‘कृपा करुन आलियाला वरुणसोबत काम करु द्या, तिला त्याच्यासाठी सोडा; आणि सलमानला माझ्यासाठी’. या कार्यक्रमात सलमान विषयी विचारण्यात आलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत कतरिनाने त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये सलमान- कतरिनावरच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. सध्या हे दोन्ही कलाकार अली अब्बास जफरच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटामुळे सलमान- कतरिनाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here