संगीतमय माणसाचा शोध, माणसातील संगीताचा शोध झी युवावर शोध संगीत सम्राटाचा !!

 

Sangeet Samrat

ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येते. संगीत एक अशी प्रक्रिया आहे की, तिच्या माध्यमातून मानवी भावनांना सृजनात्मक रूप दिले जाऊ शकते. संगीतच आपल्या मनाला तसेच मेंदूला आनंद प्रदान करीत असते. जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्यांला संगीत आवडत नसेल. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांचे संगीताशी आगळेवेगळे नाते जुळले आहे. प्रतिभा, अभिरुचि व परिश्रम घेणार्या कलाकाराला संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. पण केवळ काही व्यक्तींना परमेश्वराकडून ही देणगी मिळलेली असते. मात्र, या दिशेने करियरची वाटचाल सुरू करण्यासाठी भरपूर अभ्यास व सरावाची आवश्यकता असते. आणि त्याच बरोबर एका मोठ्या संधीची..व्यासपीठाची आवश्यकता असते आणि हीच संधी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची आवडती वाहिनी, “झी युवा” आपल्यासाठी घेऊन येत आहे.

संगीत सम्राटमध्ये संगीतमय माणसाचा शोध, माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे नाही तर संगीत सम्राट हा कार्यक्रम अश्या कलाकारांसाठी आहे जे कोणत्याही वाद्द्यापासून, वस्तूपासून किंवा तोंडाने आवाज काढून सुमधुर संगीत बनवू शकतील. या कार्यक्रमात मुख्यतः गायन, वाद्य वाजवणे, तोंडाने आवज काढून संगीत बनवणे  असे परफॉर्मन्स सुद्धा असतील. या कार्यक्रमात तुम्ही एकट्याने किंवा समुहानाने सहभागी होऊ शकता. वयाच्या ४ वर्षांपासून ते आयुष्याच्या कोणत्याही वयातील मराठी बोलणारे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. ढोलपथके, बँड, गावागावातील संगीत, प्रत्येक प्रकारचं संगीत या कार्यक्रमात पाहायला मिळेल. महाराष्टात ज्यांच्या रक्तात संगीत आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here