‘शक्तिमान’ सध्या करताहेत तरी काय?

शक्तिमानवर जेवढं लोकांनी प्रेम केलं तेवढं इतर व्यक्तिरेखांबाबत घडलं नाही

‘शक्तिमान’ कोण हे माहिती नाही असा व्यक्ती सापडणे तसे दुर्मिळच. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच शक्तिमानचे चाहते होते. ‘शक्तिमान’ ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकात एवढी प्रसिद्ध होती की, ‘शक्तिमान’ ज्या पद्धतीने उडतो अगदी तसंच उडण्याचा प्रयत्न अनेक मुलं करायची.

काही वर्षांनी अभिनेते मुकेश खन्ना हे अभिनयापासून दूर झाले. त्यांच्याबद्दलच्या फारशा बातम्या येत नसल्यामुळे त्यांचा आवडता शक्तिमान नक्की करतोय तरी काय असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. पण सध्या ते जे काही करतायेत ते ऐकून तुम्हीही दंग व्हाल. भलेही मुकेश सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नसतील पण ते पुढील पिढीला अभिनयाचे धडे गिरवायला शिकवत आहेत. सध्या मुकेश त्यांच्या दोन अभिनय शाळांमध्ये मुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देत आहेत.

खन्ना यांचं स्वप्न अशा अनेक कार्यशाळा सुरू करण्याचे आहे. या दोन कार्यशाळांशिवाय मुकेश यांनी जिथून अभिनयाचे धडे गिरवले तिथेही त्यांनी तीन महिन्यांचा एक कोर्स सुरू केला आहे. त्यांची मुलांना शिकवण्याची ही तळमळ अनेकांनाच सुखावून गेली आहे.

एक वेळ अशी होती जेव्हा मुकेश खन्ना यांच्यासारखं स्टारडम कोणालाही नव्हतं. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध होत्या. मग ती भीष्म पितामहची व्यक्तिरेखा असो किंवा शक्तिमान किंवा आर्यमान… प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी मुकेश जीवतोड मेहनत घ्यायचे. पण शक्तिमानवर जेवढं लोकांनी प्रेम केलं तेवढं इतर व्यक्तिरेखांबाबत घडलं नाही. या व्यक्तिरेखेने मुकेश यांना अफाट प्रसिद्धी आणि श्रीमंती दिली.

पण वेळेनुसार मुकेश यांचे स्टारडम कमी होत गेले आणि छोट्या पडद्यावरून ते गायबच झाले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी एक दोन मालिकांमधून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसे यश मिळाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here