​सिद्धार्थ चांदेकर रवाना झाला लंडनला

 

​सिद्धार्थ चांदेकर रवाना झाला लंडनला

“​सिद्धार्थ चांदेकर नुकताच लंडनला रवाना झाला असल्याचे त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंगला पोस्ट केले आहे. पण तो लंडनला का जातोय याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे.”

                             Shidharth Chandekar Marathi Actor

सिद्धार्थ नेहमीच त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर अॅक्टिव्ह असतो. त्याच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच तो कोणत्या चित्रपटात काम करत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कसे सुरू आहे याविषयी देखील तो माहिती देत असतो. तो सध्या गुलाबजाम या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तो सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार आहे. सोनालीसोबत काम करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना सोनाली आणि सिद्धार्थ अशी नवी जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर देखील सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान तो किती मजा मस्ती करतो हे सगळे तो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असे. या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले असून सिद्धार्थने त्याच्या सोशल नेटवर्किंगवरून याची घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटाचे चित्रीकरण करताना खूप मजा मस्ती आली असे त्याने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here