बाहुबली 2 सध्या सर्व विक्रम मोडत असतानाच मराठी सिनेविश्वातून एक जबरदस्त बातमी आली आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी आपल्या ट्विटमध्ये रितेश देशमुखचा उल्लेख करत रितेश शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवत असल्याचं आपण ऐकल्याचं म्हटलं आहे. या सिनेमाचं बजेट 225 कोटींहून जास्त असल्याचंही राम गोपाल वर्मांनी लिहिलंय. आपल्या ट्विटमध्ये रितेशचं कौतुकही त्यांनी केलं आहे.

दरम्यान गेले 2 आठवडे बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या बाहुबली 2 चं बजेट तब्बल 500 कोटी होतं. मात्र मराठीत 250 कोटी बजेट असणारा शिवाजी हा पहिलाच सिनेमा आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे स्वत: रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रवी जाधव याचं दिग्दर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here