तेजश्री प्रधान एका नव्या भूमिकेत

मोबाईल, लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेली तरुणाई आणि एवढं असतं तरी काय त्या डब्यामध्ये असा प्रश्न पडलेला पालक वर्ग हे घराघरात दिसणारं चित्र. काल- परवापर्यंत विविध प्रश्न विचारून भंडावून सोडणारी मुलं अचानक मोठी होतात आणि तुम्हाला नाही कळणार हो हे म्हणून विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लागतात. मग आपल्यातलं आणि मुलांमधलं हे अचानक निर्माण झालेलं अंतर दूर करण्याच्या उद्देशाने किंवा मुलांशी मैत्रीचं नातं निर्माण करण्याच्या उद्देशाने, आपणही कूल होऊन शकतो हे दाखवण्यासाठी आई-बाबा ‘सोशल’ होतात आणि मग या नवीन तंत्रज्ञानामुळे, जग किती जवळ आलंय या जाणीवेमुळे हे नव्याने सोशल झालेले आई बाबा भांबावून जातात, गोंधळतात आणि प्रसंगी तरुणाईपेक्षाही जास्ती ‘सोशल’ होऊन जातात.

नुकताच भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भा.डी.पा. या वेब चॅनेल आणि ‘मुरांबा’ च्या टीम ने केलेला ‘आई बाबा लाइव्ह जातात तेव्हा’ हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. मुळात आपली मुलं फेसबुकवर लाइव्ह जातात म्हणजे काय करतात बुवा या उत्सुकतेपोटी लाइव्ह गेल्यानंतर मुलांपेक्षाही भन्नाट कल्पना आई बाबांना सुचतात आणि मग इतके दिवस मुलांनी ठेवलेलं सिक्रेट अचानकपणे आई बाबा फेसबुक लाइव्ह वर घोषित करणं, प्रसंगी आपण सांगू हा हे मार्कला असं म्हणून ‘मार्क झुकेरबर्गला’ देखील सल्ला देणं अशा निरागस गमतीजमती घडतात. हा व्हिडीओ पाहिला की हे आपल्याही घरात घडू शकतं असं प्रत्येकाच्याच मनात आल्यावाचून रहात नाही.

आपली प्रत्येकाची आयुष्यातली पहिली मैत्रीण म्हणजे आई. आपल्या प्रत्येक बारीक सारीक सवयी माहिती असणारी, काळजी घेणारी, उपदेश करणारी, दटावणारी प्रसंगी इमोशनल ब्लॅकमेल करणारी सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आईच असते पण वय वाढत जातं, ओळखींचा परीघ वाढत जातो तसा आपल्याला या बालमैत्रिणीचा विसर पडत जातो. या बालमैत्रिणीची अचानक आठवण येण्याचे कारण म्हणजे ‘मुरांबामधील’ आलोकची बालमैत्रीण, त्याच्या आईची ओळख करून देणारा ‘टीजर’.

एकुणातच प्रत्येकाच्याच घरातील गोष्ट सांगणारे हे दोन्ही व्हिडीओ ‘मुरांबा’ मधील आलोक आणि त्याच्या कूल आई-बाबांविषयी उत्सुकता वाढवत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here