Tiger Zinda Hai

अभिनेता सलमान खानसोबत काम करण्याचा आनंद कोणाला नसणार? त्यातही बॉलिवूडच्या या ‘दबंग’ अभिनेत्यासोबत खास मैत्री असेल तर मग काम करण्याची मजाच काही वेगळी असेल यात शंका नाही. अभिनेत्री कतरिना कैफही सध्या असाच आनंद अनुभवत आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना आणि सलमान सध्या एकत्र असल्याचं पाहायला मिळतंय. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असणाऱ्या कतरिनालासुद्धा सलमानसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाहीये.

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला हा फोटो पाहता तरी असाच अंदाज बांधावा लागत आहे. मुख्य म्हणजे यात सलमानसोबचं तिचं बॉण्डिंगही पाहण्याजोगं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो चर्चेत आला होता. ज्यामध्ये कतरिनाने सलमानला ‘फोटोबॉम्ब’ केलं होतं. पण, आता मात्र कॅट स्वत:हूनच या ‘टायगर’सोबत पोझ देताना पाहायला मिळते आहे. या दोन्ही कलाकारांच्या फोटोला नेटिझन्सनीही चांगलंच उचलून धरल्याचं पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here