‘ट्युबलाइट’ची चिनी अभिनेत्री झू झू येणार भारतात

चिनी अभिनेत्री झू झू ही ‘ट्युबलाइट’ या आपल्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात झू झू ही सलमान खानसोबत महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. याविषयी कबीर खानने, ‘माझ्या चित्रपटांत नेहमीच अभिनेत्रींची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. या चित्रपटातही झू झूने महत्त्वाची भूमिका साकारली आहे,परंतु आताच आम्ही याविषयी जास्त बोलू शकत नाही. ती आता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात तर येत आहे, परंतु तिचा पूर्ण कार्यक्रम अजून तयार झाला नसल्याचे म्हटले आहे. पीके आणि दंगल यांसारख्या भारतीय चित्रपटांनी चीनमध्ये चांगली कमाई केली आहे. त्यामुळेच ट्युबलाइटचे निर्मातेही हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान,’जेव्हा भारतीय चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्याची वेळ येते, तेव्हा तेथील मार्केट अचानक बदलून जाते. अगोदर त्यांना चित्रपट दाखवावा लागतो आणि त्यानंतर तो चित्रपट त्यांना आवडला तरच तो चित्रपट पास केला जात असल्याचेही कबीर खानने यावेळी म्हटले. ट्युबलाइट हा 2015 साली आलेला चित्रपट ‘लिटिल बॉय’चे भारतीय रुपांतरण आहे, परंतु त्याच्या दिग्दर्शकाचे असे म्हणणे आहे की, हा चित्रपट भारतीय भावना आणि दृष्टिकोनातून बनवला गेला आहे.

ट्युबलाइटमध्ये सलमानसोबतच सोहेल खान आणि ओम पुरीही पहायला मिळणारेत. तर शाहरूख खानही यामध्ये पाहुणा कलाकार असेल. हा चित्रपट ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here